राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर महिला आघाडी कार्यकारणी जाहीर....

सोलापूर : राष्ट्रवादी
काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांचे विचार
जनसामान्यांपर्यंत पोहोचिण्या करिता
प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब काम करीत असून त्यांच्या नेतृत्वाखाली महिला
सक्षमीकरण करत महिलांना न्याय देण्याचे राज्याच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर
काम करीत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महिला पक्ष निरीक्षक दिपाली
पांढरे यांच्या सूचनेनुसार सोलापूर शहर
महिला अध्यक्ष संगीताताई जोगदनकर कार्याध्यक्ष चित्राताई कदम यांनी ही पदाधिकारी
निवड प्रक्रिया पार पडली . सुरुवातीस माता रमाई यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या
शुभहस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पक्ष निरीक्षक दिपाली
पांढरे यांच्या शुभहस्ते नूतन महिला पदाधिकाऱ्याना यावेळी नियुक्ती पत्र देण्यात आले . यावेळी नूतन महिला
पदाधिकाऱ्यांना पक्ष निरीक्षक दिपाली पांढरे यांनी पक्ष संघटन वाढीसाठी महत्वपूर्ण
योगदान आणि वेळ देणे अपेक्षित आहे.येणाऱ्या काळात अजित दादांचे हात बळकट
करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या महिला पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व शासकीय योजनांचा लाभ गरजू महिलांपर्यंत
पोहोवण्यासाठी विशेष परिश्रम घेणे गरजेचे आहे असेही प्रतिपादन महिला पक्ष निरीक्षक
दिपाली पांढरे यांनी यावेळी केले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, माजी परिवहन समिती
सभापती आनंद मुस्तारे ,सहकार सेल अध्यक्ष भास्कर आडकी ,वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, उत्तर
विधानसभा अध्यक्ष प्रकाश झाडबुके, जनरल सेक्रेटरी प्रमोद
भोसले,सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, अल्पसंख्याक
अध्यक्ष अमीर शेख महिला आघाडी अध्यक्ष
संगीता जोगधनकर,कार्याध्यक्ष चित्रा कदम , महिला सचिव प्राजक्ता बागल,
सुवर्णा झाडे , यांच्यासह प्रमुख महिला आघाडी
प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र
संचालन सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, प्रस्तावना महिला आघाडी
अध्यक्ष संगीता जोगधनकर, तर आभार प्रदर्शन महिला आघाडी
कार्याध्यक्ष चित्रा कदम यांनी मानले...
नूतन महिला आघाडी पदाधिकाऱ्यांची नावे खालील प्रमाणे
1) रेणुका मंद्रूपकर - दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष
2)कल्पना भोसले - सचिव
3) मंजुषा डोईफोडे - शहर संघटक
4) सुजाता सकट - प्रभात क्र. 40 अध्यक्ष
5) रेणुका स्वामी - प्रभाग क्र. 40 कार्याध्यक्ष
6) उमदेवी झाडबुके- उत्तर विधानसभा अध्यक्ष
7) सुवर्णा ढेपे
उत्तर विधानसभा - कार्यध्यक्ष
8) राजेश्वरी पार शेट्टी - उत्तर विधानसभा सचिव
9) उमा रवी वाघमारे - सचिव
10) शमशाद तांबोळी - सचिव
11) भारती विनायक राऊत - सचिव
13) ॲड.शाईन शेख - प्रभाग क्रमांक 22 अध्यक्ष
14) दिपमाला जगझाप - प्रभाग क्र. 22 कार्याध्यक्ष
15) दीपा राजू वाघमारे - सचिव
16) जयश्री झाडबुके - सचिव
17) रेणुका मंद्रूपकर
- दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष
18) सुरेखा घाडगे -
19) प्रिया पवार- शहर सरचिटणीस
20) अर्चना दुलंगे - मध्य विधानसभा अध्यक्ष