कुख्यात रौडीशुटर भागप्पा हरीजन याची हत्या

विजयपूर - जिल्ह्यातील सीमा भागातील भीमा नदी काठ परिसरात अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कुख्यात रौडीशुटर भागप्पा हरीजन  (वय ५०) याची काल रात्री दहाचा सुमारास निघृणपणे हत्या करण्यात आली आहे.

 विजयपूर शहरातील आकाशवाणी केंद्रा समोर असलेल्या मदिना नगर येथे भाड्याच्या घरात राहत असलेल्या घराजवळच भागप्पा हरीजन याची पूर्ववैमनस्यातून  निघृण रित्या हत्या करण्यात आली आहे 

 जेवण करून वाकिंग करण्यासाठी बाहेर पडलेल्या भीमप्पा याच्यावर काही अज्ञातांनी हल्ला करून प्रारंभी गोळ्या झाडल्या, नंतर धारधार हत्याराने  त्याचा शरीरावर, चेहऱ्यावर अनेक वार करून भीषण रित्या हत्या केली आहे. घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी सह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेऊन पाहणी केली असून अधिक तपास करीत आहेत.

   भीमा तीर परिसर व जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात घडलेल्या खून, दरोडा ,खंडणी, गोळीबार , धमकी देणे यासह खूनप्रकरणी सहभागी असलेल्या कुख्यात रौडीशुटर भागप्पा हरीजन मूळचा आलमेल तालुक्यातील ब्याडीहाळ गावाचा, त्याचावर सहा खूनप्रकरणी व चार इतर प्रकरणी गुन्हा दाखल आहेत. मुख्यतः २००० साली दक्षिण सोलापूर धोत्रे गावात पोलीसांनी कुख्यात रौडीशुटर चंदप्पा हरिजन याचा इनकौंटर केले होते त्यावेळी भागप्पा याने पोलीसांवर गोळीबार केला होता त्यानंतर तो अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी होता 

  जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिलेल्या माहितीनुसार चार ते पाच जणांनी भागप्पा याचावर हा हल्ला केल्या असून अधिक तपास सुरू असलेल्या सांगितले

भागप्पा हरीजन याची पाश्र्वभूमी

भागप्पा हरिजन हे मूळचे अलमेल तालुक्यातील ब्याडीहाळ गावच्या असून सुरुवातीपासूनच भीमातीराच्या कुख्यात गुंड चंदप्पा हरीजन याचा सहकारी, भागप्पा ने देखील तोच मार्ग अवलंबला आणि त्याच्यावर चंदप्पासोबत अनेक खून प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचा आरोप होता.

भागप्पा यांच्याविरुद्ध १० गुन्हे -

भागप्पा हरिजन यांच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात एकूण दहा गुन्हे दाखल आहेत, ज्यात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, गोळीबार आणि धमकी देणे यांचा समावेश आहे.

- चंदप्पावर हरिजनचा नातेवाईक मुथुराजाची हत्या केल्याचा आरोप आहे.

- १९ जुलै २०२० रोजी त्याने भारतीय सोने व्यापारीला तीन किलो सोने किंवा ५ कोटी रुपयांची मागणी करून धमकी दिल्याचा आरोप आहे.

- १९९७ मध्ये चडचण पोलिस स्टेशन परिसरात झालेल्या एका हत्येत भागप्पा सहभागी असल्याचा आरोप आहे.

- १९९८ मध्ये आळंद पोलिस ठाण्यात हद्दीत झालेल्या दोन खून आणि एका अपहरण प्रकरणातही त्याचे नाव आले होते.

- १९९९ मध्ये अलमेल पोलिस स्टेशन परिसरात झालेल्या एका हत्येत त्याचे नाव गोवले गेले होते 

२००० मध्ये पोलिसांवर गोळीबार, ब्याडीहाळ येथे खून, आळंद पोलीस ठाण्या हद्दीत खून,

२००१ मध्ये अलमेल पोलिस स्टेशन परिसरात साक्षीदारांवर गोळीबार आणि खून केल्याचा आरोप.

- २००३ मध्ये अफजलपूर तालुक्यातील शिरोळ येथे झालेल्या चार जणांच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप.

२०१७ मध्ये त्याच्यवर गोळ्या  झाडण्यात आले होते

८ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी १०.४० वाजता जिल्हा न्यायालयाच्या आवारात  भागप्पा हरिजन यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आले होते तीन गोळ्या शरीरात घुसून ही तो वाचला होता.

२००० मध्ये भीमातीराचा  चंदप्पा हरिजन पोलिस चकमकीत मारला गेल्यानंतर, १४ वर्षांनंतर चंदप्पाचा भाऊ बसवराज हरिजनची हत्या करण्यात आली होती यामध्ये भागप्पा सहभागी असल्याचे सांगण्यात आले. जर परिस्थिती अशीच चालू राहिली तर भागप्पा आपल्यापैकी कोणालाही सोडणार नाही असा विचार करून, चंदप्पाच्या भावाचा मुलगा भीमा हरिजन याने त्याच्या ओळखीच्या लोकांना सुपारी देऊन त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुपारी घेतलेल्यानी न्यायालयाच्या आवारात भागप्पावर तीन गोळ्या झाडल्या, परंतु उपचारानंतर भागप्पा बचावला. काल मात्र त्याचा शेवट झाला.

  चंदप्पाच्या एकेकाळी सहकारी असलेल्या भागप्पा व चंदप्पा यांनी मोठ्या प्रमाणात मालमत्ता केली होती  चंदप्पाच्या हत्येनंतर मालमत्तेचे वाटपावरून चंदप्पाचा भाऊ बसवराज व भागप्पा हरीजन यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते करोडो रुपयांची मालमत्तांचे वाटणी वरुन ही घटना घडली असल्याची चर्चा करण्यात येत आहे.


दीपक शिंत्रे