महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील रस्त्यांची केली पाहणी, कचरा व मलमत्ता कराची केली तपासणी..

सोलापूर - सोलापूर शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका
आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी विविध रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करत रस्त्यांची
दुरवस्था, कडेला पडलेला कचरा आणि मालमत्ता कर वसुलीबाबतची स्थिती याचा आढावा घेतला. महापालिकेचे
आयुक्त डॉ.सचिन ओंम्बासे यांनी आज रामलाल चौक ते सरस्वती चौक, शुभराय आर्ट गॅलरी ते पोलीस कल्याण केंद्र लिंक रोड, नवी वेस पोलीस चौकी ते व्हीआयपी रोड, पांजरापुळ चौक
ते निराळे वस्ती, शेटे वस्ती तसेच निराळे वस्तीचे आंम्बेसीटर
हॉटेल या सह प्रमुख रस्त्याची पाहणी केली. या पाहणी दरम्यान महापालिका आयुक्त डॉ.
सचिन ओम्बासे यांनी शहरातील विविध भागांमध्ये प्रत्यक्ष भेट देत दुकान, हॉस्पिटल व घरगुती मिळकतींच्या मिळकत कराची तपासणी केली. त्यांनी
रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या बांधकामांची पाहणी करून मिळकत कर नोंदणीची
पडताळणी केली.या पाहणी दरम्यान काही
ठिकाणी चुकीच्या प्रकारे कर वर्गीकरण झाल्याचे आढळले. त्यामुळे संबंधित
अधिकाऱ्यांना अशा मिळकतींची पुन्हा नोंद घेऊन योग्य कर लावण्याचे निर्देश
आयुक्तांनी दिले तसेच रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्यामुळे आरोग्याच्या
दृष्टीने धोका निर्माण होत आहे. त्यामुळे स्वच्छता विभागाने दररोज ठरावीक वेळेत
सफाईची कार्यवाही करावी व कचरा व्यवस्थापन यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबवावी,
असे आदेश त्यांनी दिले.या दौऱ्यात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त
संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे,नगर
अभियंता सारिका आकूलवार, सह अभियंता प्रकाश दिवाणजी, विभागीय अधिकारी प्रकाश सावंत विविध विभाग प्रमुख, आरोग्य
निरीक्षक संबंधित अधिकारी उपस्थित होते.