बई महापालिकेतील महापौर पदावर सस्पेंस कायम; शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, भाजप–शिवसेना तणाव वाढला

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर सत्तास्थापनेचा पेच अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. भाजपने ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला असला तरी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११४ जागांचा आकडा गाठण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) चे २९ नगरसेवक भाजपसाठी निर्णायक ठरणार आहेत. दुसरीकडे, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने ६५ जागांवर विजय मिळवला आहे. महापौर पदावरून रस्सीखेच महापालिकेचा निकाल लागल्यानंतर महापौर पदावरून सध्या मोठा सस्पेंस निर्माण झाला आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी आपल्याच नेत्याला महापौर करण्याचा दावा ठोकला आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या विषयावर कठोर भूमिका घेतली असून, संख्याबळात सर्वात मोठा पक्ष असल्याने महापौर पदावर भाजपचाच हक्क आहे आणि त्यात कोणतीही तडजोड होणार नाही” असे स्पष्ट संकेत दिल्याची माहिती आहे. शिंदेंचा दिल्ली दौरा चर्चेत या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिंदे गट अद्याप आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे या दौऱ्यातून स्पष्ट होत असल्याचे बोलले जात आहे. दिल्लीमध्ये मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना (शिंदे गट) नेते राहुल शेवाळे यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीत उपस्थित होते. या बैठकीत महापौर पदासह विविध स्थायी समित्यांवरील सत्तावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. युतीसमोर कठीण परीक्षा मुंबईतील सत्ता टिकवण्यासाठी भाजप–शिवसेना युती आवश्यक असली तरी महापौर पदावरून सुरू असलेला तिढा सुटणार की आणखी चिघळणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत दिल्लीतील निर्णय मुंबईच्या राजकारणाची दिशा ठरवतील, हे मात्र निश्चित मानले जात आहे.