श्री. वीरभद्रेश्वर देवाची यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थित संपन्न झाला.
.jpeg)
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री. वीरभद्रेश्वर देवाची यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थित संपन्न झाला.
मंद्रूप येथील वीरभद्रेश्वर मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.येथील यात्रेस अनेक वर्षाची मोठी परंपरा आहे.यंदाही यात्रा उत्साहाने साजरा झाला.
शुक्रवारी रात्री दहा वाजता विधीवत पूजा करून अग्नी प्रज्वलित करण्यात आली. याच ठिकाणी शोभेचे दारूकाम झाले. रात्री मंदिरात श्री.वीरभद्रेश्वर व काशी विश्वनाथ भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला.
शनिवारी पहाटे श्री.वीरभद्रेश्वर देवास महभिषेक करण्यात आले.त्यानंतर सकाळी दहा वाजता श्री'ची नंदीध्वज व पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर दुपारी बारा वाजता अग्निप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.त्यानंतर मंदिरात पालखीचे आगमन होऊन येथे 'श्री'ची महाआरती करण्यात आले त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रगतशील शेतकरी बाळासाहेब तोडकरी यांच्या निवासस्थानी जंगम, सुतार आणि पुरवंतांना आणि उपस्थित भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. यावेळी युवा नेते मनिष देशमुख यांनीही देवस्थानाला भेट देऊन श्री'चे दर्शन घेतले.
यावेळी नागनाथ सिंहासन,शिवानंद सिंहासन, विश्वनाथ सिंहासन,वीरभद्र सिंहासन,अप्पासाहेब उंबरजे,चंद्रशेखर हिरेमठ,मळसिध्द मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, गुरय्या स्वामी,विश्वनाथ हिरेमठ,राजशेखर उंबरजे, राजेश सि.स्वामी, अशोक सिंदखेडे,शांतय्या स्वामी,शिवय्या स्वामी, विश्वनाथ सिंदखेडे,एडवोकेट,नागेश मेंडगुदले, सिद्राम बिराजदार,शिवण्णा पंचम,इरण्णा सुतार, सिताराम सुतार,सिध्दण्णा लिगाडे, सुभाष लिगाडे, सिध्दलिंग म्हेत्रे,सुरेश स्वामी, राजशेखर स्वामी,षडाक्षरी स्वामी,श्रीशैल स्वामी, विवेकानंद सुतार यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.