मनरेगा योजनेचे सर्व कामे ताबडतोब सुरू करण्यात यावेत, तसेच निधी इतरत्र वळवू नये अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांची संसद अधिवेशनात केली.
सोलापूर : आज रोजी संसदीय अधिवेशनादरम्यान सोलापूरच्या खासदार
प्रणिती सुशिलकुमार शिंदे यांनी मनरेगा योजनेचे सर्व सार्वजनिक कामे थांबवण्याच्या
महाराष्ट्र मनरेगा शासानाच्या अलीकडील आदेशावर खासदार प्रणिती शिंदे यांनी आवाज
उठविला. या निर्णयामुळे पाणंद रस्ते, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात प्रवेश
देणारे आवश्यक रस्ते, ग्रामीण भागातील रस्ते, तलाव, नाल्यावरील रस्ते, ही
सर्व कामे बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा त्रास होत आहे,
त्यामुळे ही कामे ताबडतोब सुरू करण्यात यावेत. या योजनेचे निधी
इतरत्र वळवू नये. सताधाऱ्यांकडून निवडणूक जिंकण्यासाठी निधी इतरत्र वळविल्यामुळे
मनरेगा योजनेंतर्गत 100 दिवसांपर्यंतची मजुरी केंद्र
शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून आणि 100 दिवसांच्या वरील
मजुरी राज्य शासनाच्या निधीतून दिली जाणारी मजुरीची निधी गेल्या दोन महिन्यापासून
दिले नाही. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. त्यामुळे.महाराष्ट्र शासनाच्या या आदेशाला
स्थगिती मिळावी अशी मागणी केली.