तीच्या मृत्यूनंतर दोन मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; १७ वर्षीय मुलाचा पोलिसांत न्यायासाठी आक्रोश

उत्तर प्रदेश :- सहारनपूर जिल्ह्यातील गंगोह कोतवाली
परिसरात एक धक्कादायक सामाजिक घटना समोर आली आहे. पतीच्या मृत्यूनंतर एका महिलेने
तिच्या प्रेमीसोबत पळून जाऊन तिच्या दोन मुलांना बेसहारा सोडले आहे. ही घटना २५
जुलैपासून बेपत्ता असलेल्या महिलेबाबतची असून, तिच्या १७ वर्षीय
मुलाने पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. मुलाचा गंभीर आरोप पीडित मुलगा मनीष
वर्मा याने सांगितले की, त्याच्या आईचे अनुज भाटी
(मुझफ्फरनगरचा रहिवासी) याच्याशी प्रेमसंबंध होते. आईने घरातून ३.५ लाख रुपये रोख
रक्कम, मौल्यवान दागिने आणि घरातील इतर वस्तू घेऊन पळ काढला.
ती रेहाना, नूरजहाँ आणि शहजादी नावाच्या मैत्रिणींनसोबत पंजाबला
गेली होती. धमकी आणि मारहाणीचा आरोप मनीषच्या आरोपानुसार, आईच्या
मैत्रिणींनी त्याला धमकावलं आणि मारहाण केली. त्या महिलांचा काही शेतकरी संघटनांशी
संबंध असल्याचा दावा त्याने केला. त्यामुळे पोलीसही कारवाई करण्यास घाबरत असल्याचे
त्याचे म्हणणे आहे. अन्नधान्याची कमतरता आणि भयानक परिस्थिती मनीष आणि त्याचा भाऊ
सध्या एकटेच राहत असून, घरात अन्नधान्याची कमतरता आहे. आईचा
प्रियकर वडिलांची जमीन आणि मालमत्ता हडप करण्याच्या तयारीत असल्याचा गंभीर आरोपही
मुलाने केला. पोलिसांची निष्क्रियता मनीषने पोलिसांना सर्व माहिती दिली आहे. तरीही
कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. फसवणूक, धमकी आणि शारीरिक अत्याचाराचे आरोप असूनही संबंधित महिला आणि तिचा प्रियकर
अद्याप मोकळे फिरत आहेत. मुलाने आई आणि अनुज भाटीवर कठोर कारवाई करण्याची मागणी
केली आहे. प्रकरण सध्या तपासाधीन असून, पोलीस गुन्हा दाखल
करून तपास करत आहेत.