मूडीजचा इशारा : ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ बॉम्ब’मुळे अमेरिका गंभीर मंदीच्या उंबरठ्यावर

एका बाजूला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभर टॅरिफ धोरणांचा मोठा यशस्वी परिणाम होत असल्याचे सांगत आहेत. मात्र, मूडीज ॲनालिटिक्सच्या ताज्या अहवालाने मोठा इशारा दिला आहे. मूडीजचा इशारा मूडीजचे मुख्य अर्थतज्ज्ञ मार्क झँडी यांच्या म्हणण्यानुसार :
- अमेरिकन
अर्थव्यवस्थेचा जवळपास एक-तृतीयांश हिस्सा मंदीत आहे किंवा मंदीच्या धोक्यात
आहे.
- आणखी एक-तृतीयांश
राज्यांमध्ये अर्थव्यवस्था स्थिरावली आहे.
- केवळ उरलेल्या
राज्यांमध्येच वाढ नोंदली जात आहे.
मंदीची आकडेवारी
- ऑगस्ट २०२५ मध्ये अमेरिकेचा
मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय (उत्पादन
खरेदी व्यवस्थापक निर्देशांक) घसरून ४८.७ वर आला.
- सलग सहाव्या
महिन्यात उत्पादन क्षेत्रात घसरण नोंदली गेली.
- काही उत्पादकांनी
सद्यस्थितीला "US Great
Recession" पेक्षाही वाईट म्हटले.
अर्थतज्ज्ञांचे
मत
- ट्रम्प प्रशासनाच्या
आयात शुल्क धोरणाचे दुष्परिणाम दिसून येत आहेत.
- अपेक्षित लाभाऐवजी
हे टॅरिफ अमेरिकेच्या औद्योगिक पायाला कमकुवत करत आहेत.
- इन्स्टिट्यूट फॉर
सप्लाय मॅनेजमेंटच्या सर्वेक्षणानेही ही स्थिती पुष्टी केली.
- ट्रम्प यांचे समर्थन
तथापि, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या व्यापार
धोरणाचे समर्थन करत म्हणाले –
“टॅरिफ हे देशाच्या हितासाठी आहेत. अमेरिकेच्या घटत्या औद्योगिक
पायाला पुन्हा उभारी देण्यासाठी हा निर्णय आवश्यक आहे.”