देशभरात मान्सूनचा जोर | २५ जूनपर्यंत वायव्य भारत व्यापण्याची शक्यता – IMD

नवी दिल्ली | देशात मान्सूनने वेग पकडला असून, हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार येत्या २५ जूनपर्यंत तो वायव्य भारताचा बहुतांश भाग व्यापू शकतो. यामुळे पेरणीसाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांमध्ये किनारपट्टी कर्नाटक, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि अन्य भागांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः कारवार (कर्नाटक) येथे सर्वाधिक २४२ मिमी पाऊस पडला आहे. गेल्या २४ तासांतील पावसाची ठळक आकडेवारी (१२ जून सकाळी ८.३० ते १३ जून सकाळी 8.३० पर्यंत) :

  • किनारपट्टी कर्नाटक :
    • कारवार : २४२ मिमी
    • होनावर : १२१ मिमी
    • मंगळूर (बाजपे) : ७२ मिमी
  • कोकण आणि गोवा :
    • पणजी : ९१ मिमी
    • मुरगाव : ५७ मिमी
    • रत्नागिरी : ४१ मिमी
  • मध्य महाराष्ट्र :
    • कोल्हापूर : ६९ मिमी
  • केरळ आणि माहे :
    • कोचीन विमानतळ परिसर : ४१ मिमी
  • ईशान्य भारत (मिझोराम) :
    • लेंगपुई : ४७ मिमी
  • अंदमान व निकोबार बेटे :
    • श्री विजया पुरम : ५७ मिमी
    • हट बे : ४० मिमी
  • लक्षद्वीप :
    • मिनिकॉय बेट : ५७ मिमी

IMD च्या मते मान्सूनची सध्याची गती समाधानकारक असून, यामुळे आगामी दिवसांत कृषी कार्याला गती मिळेल. हवामान खात्याच्या पुढील अपडेटकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.