मनसे उपाध्यक्षाच्या मुलाचा दारूच्या नशेत धिंगाणा, मॉडेलच्या कारला दिली धडक

मुंबई :-  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष जावेद शेख यांचा मुलगा राहिल जावेद याने दारूच्या नशेत मुंबईच्या अंधेरी पश्चिम परिसरात मोठा गोंधळ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्रीच्या सुमारास राहिलने मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे यांच्या गाडीला धडक दिली. राजश्री मोरे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राहिल जावेद अर्धनग्न अवस्थेत, आक्रमक भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहे. “माझ्या बापाकडून पैसे घे,” असे म्हणत त्याने राजश्रीशी वाद घातला. पोलिसांनाही धमकी घटनेनंतर घटनास्थळी आंबोली पोलीस दाखल झाले असता राहिलने “माझा बाप मनसेचा मोठा नेता आहे,” असे सांगत पोलिसांनाही दम भरला. या प्रकरणी आंबोली पोलिसांनी राहिलविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. राजश्री मोरेचा गंभीर आरोप राजश्रीने व्हिडीओत हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी तिने मराठी माणसांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचे तिने म्हटले. विवादग्रस्त वक्तव्याची पार्श्वभूमी राजश्री मोरेने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत म्हटले होते – मराठी माणसांना मेहनत करायला शिकवा, त्यांच्यात कामाची मानसिकता नाही. परप्रांतीयांनी मुंबई सोडली तर मराठी माणसांची अवस्था बिकट होईल.”

या विधानामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. संजय निरुपमांचा मनसेवर टोला शिवसेना नेते संजय निरुपम यांनी व्हिडीओ शेअर करत मनसेवर टीका केली. त्यांनी म्हटले – मराठी स्वाभिमानाचा दावा करणाऱ्या मनसेच्या नेत्याचा मुलगा मराठी महिलेला शिवीगाळ करतो, हेच का तुमची मराठी अस्मिता?” सोशल मीडियावर संतापाची लाट हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, अनेकांनी मनसेवर आणि नेत्यांच्या मुलांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे.