आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी घेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील बाप्पांचे दर्शन

सोलापूर : प्रतिनिधी

आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय बंगल्यातील गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. गणेशोत्सवानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी भेट घेतली. यावेळी गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. याप्रसंगी वर्षा बंगल्यावर केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही भेट घेऊन सोलापूर - मुंबई तसेच सोलापूर - तिरुपती, सोलापूर - बंगलोर विमानसेवेबाबत सकारात्मक चर्चा केली.  यावेळी माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, भाजपा सोशल मीडिया प्रमुख अभिषेक चिंता, अक्कलकोटचे अतुल कोकाटे, सिद्धू सुतार आदी उपस्थित होते.

श्रीविष्णुराज कोठेला थेट मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

आमदार देवेंद्र कोठे यांचे चिरंजीव श्रीविष्णुराजसोबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत शुभेच्छा दिल्या. अवघ्या आठ वर्षांच्या श्रीविष्णुराजसाठी खरोखरच हा अविस्मरणीय सुवर्णक्षण ठरला.