मिठी नदी घोटाळा : ईडीकडून मुंबईत १५ ठिकाणी छापे, आर्थिक गुन्ह्यांची चौकशी सुरू

मुंबई – मुंबईतील मिठी नदी
गाळ घोटाळा प्रकरणात आता तपासाचा धक्का बसला असून सक्तवसुली संचालनालय (ED)
कडून मुंबईतील १५ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईत चित्रपट
अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांचीही चौकशी करण्यात आली आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, दोघांचा या प्रकरणातील मुख्य
आरोपी केतन कदम याच्याशी वारंवार फोनवर संपर्क झाल्याचा संशय आहे. या घोटाळ्यात १३
आरोपींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यामध्ये BMC अधिकारी,
कंत्राटदार, दलाल आणि कंपन्यांचे संचालक यांचा
समावेश आहे. ६५ कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप या प्रकरणात ६५ कोटी रुपयांचा
आर्थिक गैरव्यवहार व मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप आहे. BMC ने
मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी गाळ हटवण्यासाठी 'पुशर व ड्रेजिंग
मशीन' खरेदी केली होती. ही खरेदी कोचीस्थित मॅटप्रॉप
टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून झाली होती. मात्र, या व्यवहारात खोट्या कागदपत्रांचा वापर करून निधीचा अपहार केल्याचे संकेत
ED ला मिळाले आहेत. BMC अधिकाऱ्यांचीही चौकशी तपासात
BMC च्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेज विभागातील अधिकारी, कंत्राटदार व मॅटप्रॉप कंपनीचे पदाधिकारी यांनी संगनमताने महापालिकेला
गंडा घातल्याचा ठपका आहे. या प्रकरणात जय जोशी याला नुकताच जामीन मिळाला असून केतन
कदम अद्याप अटकेत आहे. आरोपींची यादी आणि नेटवर्क
FIR नुसार, १३ आरोपींमध्ये:
- ५
कंत्राटदार
- ३
दलाल
- विविध
कंपन्यांचे संचालक
- BMC
चे विद्यमान आणि माजी अधिकारी
यांचा समावेश आहे.