अल्पवयीन मुलाकडून 9 दुचाकी जप्त; 3 लाखांचा ऐवज हस्तगत
सोलापूर, दि. 29 : शहरात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच सदर बझार
पोलिसांच्या डीबी पथकाने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला
ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीच्या तब्बल 9 मोटारसायकली
जप्त केल्या आहेत. या दुचाकींची एकूण किंमत सुमारे 2
लाख 90 हजार रुपये असल्याची
माहिती पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर बझार पोलीस
ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास
सुरू करण्यात आला होता. शहरातील मोटारसायकल चोरीचे इतर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बझार डीबी पथकाचे सहायक पोलीस
निरीक्षक राहुल सावंत आणि त्यांचे पथक कार्यरत होते. दरम्यान, चोरीच्या मोटारसायकल प्रकरणातील संशयितांचा शोध घेत असताना पोलिसांनी जगदंबा
चौक येथे एका अल्पवयीन मुलाला मोटारसायकलीसह ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान
त्याच्याकडून चोरीच्या आणखी मोटारसायकलींची माहिती समोर आली. पोलिसांनी
त्याच्याकडून एकूण 9 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. या कारवाईमुळे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले 9
मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले
आहेत.
कोणत्या पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस?
- सदर बझार पोलीस ठाणे
– 6 गुन्हे
- एमआयडीसी पोलीस ठाणे
– 1 गुन्हा
- फौजदार चावडी पोलीस
ठाणे – 2 गुन्हे
- एकूण – 9 गुन्हे
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी
कुर्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक अजित लकडे, रविंद्रनाथ भंडारे, डीबी पथकाचे सहायक पोलीस
निरीक्षक राहुल सावंत तसेच पोलीस अंमलदार संतोष पापडे, मुलाणी,
राजेश चव्हाण, प्रमोद पकाले, बागलकोटे, उमेश चव्हाण, सागर
गुंड, सोमनाथ सुरवसे आदींचा सहभाग होता.