सोलापूर जिल्ह्यात सौम्य भूकंपाचा धक्का

सोलापूर जिल्ह्याला भूकंपाचा संम्य धक्का सोलापूर: म्यानमार आणि थायलंडच्या प्रलयंकारी भूकंपाच्या जखमा अद्याप ताज्या असताना गुरुवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यालाही भूकंपाचा सौम्य धक्का बसला. राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार 2.6 इतक्या तीव्रतेचा धक्का बसला आहे. मात्र या भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याचे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनसीएस) आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे . सोलापूर सांगली आणि विजापूर जिल्ह्याच्या सीमेवर सांगोला तालुक्यात या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे.