खासदार रमेश जिगजीनगी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारांची भेट, ऑपरेशन सिंदूर दरम्यान उपाययोजनास पाठिंबा

विजयपूर :- जिल्ह्याचे  खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री रमेश जिगजिणगी यांच्या नेतृत्वाखाली, विजयपूर जिल्ह्यातील माजी मंत्री, माजी आमदार, मान्यवरांनी जिल्हाधिकारांची भेट घेऊन  "ऑपरेशन सिंधूर" सुरू असतानाच्या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या सर्व सुरक्षेच्या आणि आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी पाठिंबा दर्शविला. स्वतः खासदार रमेश जिगजिणगी आणि त्यांच्यासोबत असलेल्या अनेकांनी सहकार्य असल्याचे सांगितले विजयपूर जिल्ह्यातील अन्न, इंधन, स्वयंपाकाचा गॅस आणि एटीएममधील रोख पैशांची उपलब्धता व सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा झाली. पाकिस्तान आणि बांगलादेशातील अनधिकृत नागरिकांची ओळख पटवून त्यांना बाहेर काढण्यासाठी उचललेल्या पावलांबाबत आणि जिल्ह्याच्या सुरक्षेच्या परिस्थितीबाबत देखील विचारविनिमय करण्यात आला.या चर्चेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, तसेच गरज पडल्यास स्वयंसेवक म्हणून काम करण्याचा संदेश देण्यात आला.या वेळी खासदार रमेश जिगजिणगी, भाजप जिल्हाध्यक्ष गुरुलिंगप्पा अंगडी, माजी मंत्री अप्पासाहेब पटणशेट्टी, माजी आमदार रमेश भोसणूर, विधान परिषद सदस्य अरुण शहापूर, भाजप नेते विजुगौड पाटील, चंद्रशेखर कवटगी, उमेश कारजोळ, संजय ऐहोळी, मळुगौड पाटील, ईरण्णा रावूर, संजय पाटील कनमडी, सुरेश बिरादार, भीमाशंकर हदनूर, एस. ए. पाटील, विजय जोशी, राजेश तवसे, संदीप पाटील, जगदीश मुच्छंडी, संपत कुवळ्ळी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

विजयपूर:- दिपक शिंत्रे