संपूर्ण देशात मांसाहारावर बंदी घालायला हवी; अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मागणी

नवीदिल्ली:  “भारतात मांसाहारावर-नॉन वेजवर बंदी घालण्यात यावी. तसेच, देशात समान नागरी संहिता लागू  करण्यात यावं” असे मोठे विधान ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्याने  अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी हे विधान केले आहे. याविषयी बोलताना, “देशाच्या अनेक भागांत गोमांसावर बंदी घालण्यात आली आहे. मला वाटतं की, देशात फक्त गोमांसच नाही तर सर्वसाधारणपणे मांसाहारी पदार्थांवरही बंदी घातली पाहिजे. दरम्यान, ईशान्येसह काही ठिकाणी, गोमांस खाणं अजूनही कायदेशीर आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “वाह खाओ तो यम्मी, पर हमारे नॉर्थ इंडिया में खाओ तो मम्मी.”असे त्यांनी म्हटले शत्रुघ्न सिन्हा यांनी उत्तराखंडमध्ये यूसीसीच्या अंमलबजावणीबद्दल बोलताना त्यांनी,”उत्तराखंडमध्ये यूसीसीची अंमलबजावणी कौतुकास्पद आहे. देशात यूसीसी निश्चितच लागू केलं पाहिजे आणि मला खात्री आहे की, सर्वजण माझ्याशी सहमत असतील. पण त्यात अनेक बारकावे आणि त्रुटी आहेत. म्हणूनच यूसीसी तरतुदींचा मसुदा तयार करण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेतली पाहिजे. या विषयावर प्रत्येकाचं मत जाणून घेण्यासाठी त्यांचा सल्ला घेतला पाहिजे.”असे म्हटले आहे.