जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती, काँग्रेस, महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात भव्य मोर्चा

महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२५ हे घटना विरोधी व लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी हवी व हुकूमशाही यंत्रणा बळकट हवी हाच कुटील हेतू या विधेयकाच्या माध्यमातून साधला जाणार आहे. शासनाच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना दडफशाही व बळाचा वापर करून कारवाई करण्यात येणार आहे. म्हणून जनसुरक्षा कायदा मागे घेऊन आंदोलनाचा अधिकार अबाधित ठेवण्याच्या मागणीसाठी, जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती, काँग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात बुधवार दि, १० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक) येथून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चा मध्ये खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सामील होणार आहेत. तरी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, नगरसेविका, ब्लॉक फ्रंटल सेल अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे.