गोरेगाव फिल्मसिटीतील ‘अनुपमा’ मालिकेच्या सेटला भीषण आग
.jpeg)
मुंबई – सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास गोरेगाव
फिल्मसिटीमध्ये लागलेल्या भीषण आगीत प्रसिद्ध हिंदी मालिका ‘अनुपमा’च्या सेटचा
मोठ्या प्रमाणावर नुकसानीस सामना करावा लागला आहे. या दुर्घटनेत सेट पूर्णतः जळून
खाक झाला. घटनेच्या वेळी अनेक कामगार आणि क्रू मेंबर्स उपस्थित होते, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळी ७ वाजता मालिकेचं शूटिंग सुरू होणार होतं. त्याआधीच, म्हणजे ५ वाजता आग लागल्याने मोठा अनर्थ टळला. सेटवरील
आगीचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनुपमाच्या सेटजवळ
असलेले इतर मालिकांचे सेट थोडक्यात बचावले. आग अधिक पसरली असती तर मोठ्या
दुर्घटनेचे प्रमाण वाढले असते. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दल
तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. अद्याप आग नेमकी
कशामुळे लागली याचा तपास सुरु आहे. दरम्यान, ‘अनुपमा’ मालिकेच्या चित्रीकरणावर
याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. निर्मात्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत
निवेदन देण्यात आलेले नाही. या घटनेनंतर ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) चे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांना
पत्र पाठवून उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. तसेच, फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक व मुंबई कामगार आयुक्त
यांचे त्वरित निलंबन करण्याची मागणीही या पत्रात करण्यात आली आहे. AICWA ने या घटनेला निष्काळजीपणाचा परिणाम मानले असून, प्रोडक्शन हाऊस, निर्माते, टीव्ही चॅनेल आणि फिल्मसिटी प्रशासन अग्निसुरक्षा नियमांचे
पालन करत नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे.