रोममधील गॅस स्टेशनला भीषण स्फोट; २५ जण जखमी, ९ पोलिस अधिकारी आणि अग्निशमन कर्मचारीही जखमी

रोम : इटलीतील रोम शहराच्या दक्षिण-पूर्वेकडील भागात आज सकाळी
एका गॅस स्टेशनवर भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत किमान २५ जण जखमी झाले असून, ९ पोलीस अधिकारी आणि एक अग्निशमन दलाचा
कर्मचारी यांचाही समावेश आहे, अशी माहिती रोमचे महापौर
रॉबर्टो ग्वाल्टिएरी यांनी दिली. सकाळी 8 वाजताच्या सुमारास स्फोट
झाला असून, त्याचा आवाज दूरवरपर्यंत ऐकू आला. काळ्या धुराचे
आणि आगीचे लोट शहराच्या अनेक भागांतून दिसून आले. १६ सामान्य नागरिक जखमी झाले
असून, त्यातील २ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तातडीने
रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्फोटाचे संभाव्य कारण:
प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की, गॅस
गळतीमुळे हा स्फोट झाला असावा. अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव
घेतली आणि पेट्रोल पंपाजवळील एक क्रीडा केंद्र रिकामे करण्यात आले. या केंद्रात
उपस्थित अनेक मुलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
सुरक्षा यंत्रणा सज्ज: या दुर्घटनेनंतर परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आणखी स्फोट होण्याचा धोका लक्षात घेता संपूर्ण परिसर बंद करण्यात आला असून, तांत्रिक पथक तपासासाठी कार्यरत आहे.