मराठी तरुणीवर मारहाण अमराठी तरुणाने रुगणालयात त्या तरुणीला लाथ मारली व पटकले.

मुंबई:- कल्याण शहरातील नांदिवली परिसरातील एका खाजगी रुग्णालयात घडलेला रिसेप्शनिस्ट तरुणीवरचा हल्ला सध्या चांगलाच गाजत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोकुळ झा या परप्रांतीय युवकाने तरुणीच्या केसाला धरून तिला जमिनीवर आपटताना आणि फरफटत नेताना दिसत आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर समाजमाध्यमांवर संतापाची लाट उसळली होती. अनेकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र, आता या घटनेत नवीन ट्विस्ट समोर आला आहे. आधी तरुणीनेच महिलेला चपराक लगावली? नवीन समोर आलेल्या व्हिडिओ फुटेजनुसार, वाद सुरु झाल्यानंतर गोकुळ झा आणि त्याच्यासोबतच्या काही लोकांनी रुग्णालयातील रिसेप्शनवर गोंधळ घातला होता. यावेळी रागाच्या भरात तरुणीने फाईल फेकली आणि एका महिलेला चपराक लगावली. त्यानंतर परिस्थिती बिघडली आणि गोकुळ झा याने मारहाण केली. संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद सीसीटीव्हीमध्ये दिसतंय की, गोकुळ झा अचानक संतापून रिसेप्शनच्या आत घुसतो आणि त्या तरुणीला ओढून फरफटत नेतो. त्याने तिचे केस पकडून तिला जमिनीवर आपटलं. अनेकांनी ही घटना थेट जातीय आणि भाषिक वादाशी जोडली होती, मात्र नव्या फुटेजमुळे वादाचा उगम स्पष्ट झाला आहे. पोलिसांकडून तपास सुरु सध्या पोलिसांकडून या प्रकरणात चौकशी सुरु असून दोन्ही बाजूंनी एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजचा सखोल अभ्यास करण्यात येत आहे. आरोपी गोकुळ झाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. समाजमाध्यमांवर मतभेद या प्रकरणावरून समाजमाध्यमांवर मोठा वाद निर्माण झाला आहे. काहींनी गोकुळ झा याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे, तर काहीजण तरुणीच्या वागणुकीबद्दल प्रश्न विचारत आहेत.