मनीषा मुसळे हिची न्यायालयीन कोठडीत रवानगी

सोलापूर, दि. १५- प्रसिध्द मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणातील संशयित आरोपी मनीषा महेश मुसळे माने हिला गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीश एस.एन. रथकंठवार यांनी तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तिची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी तिला आज पुन्हा न्यायालयात हजर करुन पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायाधीशांनी ती मान्य करून मुसळेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.