मंद्रूप- श्रीशैल पदयात्रा ७ मार्चला निघणार

मंद्रूप : प्रती वर्षाप्रमाणे यंदाही मंद्रूप ते श्रीशैल पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून या पदयात्रेत भाविकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावेत असे आवाहन या पदयात्रेचे संयोजक तथा दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती गुरूसिध्द म्हेत्रे यांनी केले आहे. यावेळी माजी सभापती म्हेत्रे म्हणाले, मंद्रूप येथील श्री मल्लीकार्जुन देवाच्या पंचधातूच्या मूर्तीस आपण स्वता:हा श्रीशैल येथील श्री. मल्लिकार्जुन देवाच्या पिंढीवर ठेवून महाभिषेक केल्याने या पंचधातूच्या मूर्तीत प्रचंड दैवी ऊर्जा सामावल्याने या मूर्तीस मोठे महत्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे मंद्रूपला प्रतीश्रीशैल असेही म्हटले जात आहे.मंद्रूपच्या पदयात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात मोठा मान असून मल्लिकार्जुन पालखीची, पदयात्रेची आणि भाविकांचे जंगी स्वागत व पूजाअर्चा केली जाते. गेल्या ३९ वर्षापासून श्रीशैल जगद्गुरु लिगैक्य श्री.श्री.श्री.१००८ डॉ.उमापती पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी आणि विद्यमान श्रीशैल जगद्गुरु श्री.श्री.श्री.१००८ डॉ.चन्नसिध्दाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या कृपाशीर्वादाने ही पदयात्रा दरवर्षी निघते.मंद्रूप येथून मल्लीकार्जुन देवाची पालखी व कावड घेऊन भाविक श्रीशैलला पायी जात असतात.ही पदयात्रा माजी सभापती गुरूसिध्द म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली निघते. येथील मल्लीकार्जुन मंदिरात मल्लीकार्जुन देवाची पूजा-आरती करून श्री.ची पालखी जयजयकार करीत मिरवणूकीने गावातून मार्गस्थ होऊन श्रीशैलला पोहचते.यंदा ७ मार्चपासून मंद्रूप येथून ही पदयात्रा निघणार आहे.ही पदयात्रा मंद्रूप, नांदणी,धुळखेड,इंडी,इभतहळळी,आलमेल, कोराळ्ळी,सिंदगी,ग्वालगेरी,याळगी,मासकुंडल, क्वटर बसवण्णा,मसरकल्ल,गायत्री मंदिर, रायचूर, यारगेरी फाटा,आयजा,प्रदिपुरम, कलगुंटला,कलगुट्टा,ब्रम्हणकोट्टर, पामलपाडू,व्यकंटापुरम,नागलोटी,गंगनफौळी,अडकेश्वर, श्रीशैलम असे पदयात्रेचा प्रवास असणार आहे. २६ मार्च रोजी श्रीशैलम् येथे पोहचणार आहे.श्रीशैल येथे मंद्रूपच्या श्री मल्लिकार्जुन सेवा संघ आणि सोलापूर जिल्ह्यातील भक्तांकडून २६ मार्च ते ३० मार्चपर्यंत सलग चार दिवस महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पदयात्रेत सहभागी होणा-या सर्व भाविकांना पदयात्रा कमिटीतर्फे नाष्टा,भोजन व राहण्याची मोफत सोय केली जाणार आहे.इच्छुक भाविकांनी आपली नांवे मो. नं. ९८६००६७००७ या क्रमांकावर तात्काळ नोंदवावित असे आवाहन संयोजक गुरूसिद्ध म्हेत्रे यांनी केले आहे.