मँचेस्टर कसोटी | ऋषभ पंतला गंभीर दुखापत — सामन्यात पुनरागमन धोक्यात!

इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या
दिवशी भारताचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याच्या उजव्या पायाला
गंभीर दुखापत झाली आहे. तो सध्या BCCI वैद्यकीय पथकाच्या
निरीक्षणाखाली आहे आणि स्कॅनसाठी
हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. भारताने दिवसअखेर ४ बाद
२६४ धावा केल्या असून, पंतने 48 चेंडूत ३७ धावा
केल्या. मात्र ख्रिस वोक्सच्या
चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करताना चेंडू चुकून त्याच्या उजव्या
पायावर आदळला. फिजिओ योगेश परमार
तातडीने मैदानात दाखल झाले, पण दुखापत गंभीर
असल्याने पंतला मिनी-अॅम्ब्युलन्समध्ये
मैदानाबाहेर नेण्यात आले. त्याच्या पायाच्या
करंगळीजवळ जखम झाली असून, रक्तस्त्राव आणि सूज असल्याचे निदर्शनास आले
आहे. त्यामुळे पुढील डावात पंत खेळू शकेल की नाही, यावर शंका निर्माण झाली
आहे. साई सुदर्शनने पत्रकार
परिषदेत सांगितले की, "पंतला तीव्र वेदना होत
होत्या, त्याला स्कॅनसाठी
नेण्यात आले आहे. त्याने चांगली फलंदाजी केली होती. जर तो खेळू शकला नाही, तर त्याची कमतरता टीमला
जाणवेल." इंग्लंडचा फिरकीपटू लियम डायसन यानेही सांगितले की, "पंतची दुखापत किरकोळ
नाही असे वाटते. तो उत्कृष्ट खेळाडू आहे, पण यापुढे त्याचा सहभाग
या सामन्यात राहील का, हे सांगता येत
नाही." सद्यस्थितीत, शार्दुल ठाकूर (१९) आणि
रवींद्र जडेजा (१९) नाबाद आहेत. टीम इंडिया
पंतच्या अनुपस्थितीत चांगला खेळ करण्यासाठी सज्ज आहे.