समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; २ ठार, १० जखमी

सिंदखेड : समृद्धी महामार्गावर Cruiser वाहनाचा भीषण अपघात होऊन दोन प्रवासी ठार झाले, तर १० जण जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई कॉरिडॉर चॅनेल नंबर ३४४.७ वर
आज सकाळी ८ वाजता घडला.
अपघात कसा झाला?
Cruiser गाडीचे अचानक टायर फुटल्याने वाहनाचा ताबा सुटला आणि ती महामार्गावर पलटी झाली.
या अपघातात घटनास्थळीच दोन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १० प्रवासी गंभीर जखमी झाले.
Cruiser मधील सर्व प्रवासी आसेगाव देवी (ता. बाभूळगाव, जि. यवतमाळ) येथून शिर्डीला
दर्शनासाठी जात होते.
अपघातातील मृत आणि जखमींची माहिती:
मृत:
1.
विद्याबाई साबळे (वय ४०) रा. आसेगाव
देवी, ता. बाभूळगाव
2.
मोतीराम बोरकर (वय ६०) रा. आसेगाव
देवी, ता. बाभूळगाव जखमी:
१० प्रवासी जखमी असून, त्यांना समृद्धी महामार्गाच्या रुग्णवाहिकेद्वारे जालना येथे
हलविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दुर्घटनाग्रस्त वाहनांबाबत:
Cruiser वाहन (MH 25 R
3579) हे शिर्डीला जात असताना अपघातग्रस्त
झाले.
Toyota Creta (29 CB 9630) वाहनाने अपघातग्रस्त Cruiser ला पाठीमागून धडक दिली, त्यामुळे Creta वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.
पोलीस व प्रशासनाची कारवाई:
राष्ट्रीय महामार्ग पोलीस घटनास्थळी
दाखल
पोलीस उपनिरीक्षक उज्जैनकर, शैलेश पवार, ASI विष्णू नागरे आणि त्यांच्या पथकाने त्वरित मदतकार्य हाती
घेतले.
क्रेनच्या साहाय्याने महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात
आली.
या अपघाताबाबत अधिक तपास सुरू असून, वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला का, याची चौकशी केली जात आहे.