महेश कोठे यांचे हार्ट अटॅकने निधन, प्रयागराज येथे काळाने घातला घाला!

संचार डिजीटल

सोलापूर : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर महेश कोठे यांचे निधन झाले .

कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेलेल्या महेश कोठे यांच्यावर काळाने घाला घातला आहे. सकाळी आंघोळीसाठी गेलेल्या महेश अण्णा यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे सांगण्यात येत आहे. प्रयागराच्या संगमावर असलेल्या कडाक्याच्या थंडीत महेश कोठे भल्या सकाळी नदीत अंघोळ करण्यासाठी गेले होते. नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर आल्यानंतर थंडीचा त्यांना त्रास जाणवू लागला. त्यातच हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयास नेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 

महेश कोठे हे सोलापूरच्या राजकारणात सत्ता केंद्र म्हणून अनेक वर्ष आपला प्रभाव राखून होते. सभाग्रह नेता- महापौर म्हणून त्यांनी सभागृह गाजवले होते. प्रशासनावर पकड आणि दांडगा जनसंपर्क व काम करण्याची थेट शैली यामुळे महेश कोठे कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होते. महापालिका प्रशासनावर वर्चस्व असलेल्या महेश कोठे यांनी विधानसभेची निवडणूक ही लढवली होती. दुर्दैवाने ते यशस्वी झाले नाहीयेत. वडील विष्णुपंत तात्या कोठे यांच्याकडून त्यांना समाजकारणाचा आणि राजकारणाचा वारसा लाभला होता.

 सोलापुरात मकर संक्रांत आणि सिद्धरामेश्वर यात्रेची धूम सुरू असताना महेश कोठे यांचे निधनाचे वृत्त धडकताच शोक सर्वत्र शोक कळा पसरली आहे.

महेश कोठे यांच्या निधनाबद्दल सोलापुरातील विविध राजकीय कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांचे ते काका होते

अभ्यासू संयमी व मितभाषी असणारे महेश अण्णा सर्वांच्या मनामनात होते.  राजकीय नातेसंबंध सांभाळून अनेकांशी त्यांचा जवळचा ऋणानुबंध होता. विविध शैक्षणिक संस्था उभारण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. आयटी पार्क सोलापुरात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प देखील त्यांनी उराशी बाळगला होता. सोलापूर महापालिकेत महेश अण्णा यांचा वचक कायम होता. कोठे बोले महापालिका हाले असे चित्र वारंवार दिसून आले आहे.  त्यांच्या या अकाली जाण्याने राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीही न भरून येण्यासारखी आहे. दरम्यान त्यांचे पार्थिव शरीर विमानाने सोलापुरात आणणार असल्याचे समजते. त्यानंतर महेश कोठे यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.