सोलापूर महानगरपालिका 249 रोजंदारी व बदली कर्मचाऱ्यांकडून महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय(मामा)भरणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला
.jpeg)
भरणेवाडी÷ कोल्हापूर महानगरपालिकेप्रमाणे सोलापूर
महानगरपालिकेतील 249 रोजंदारी व बदली कर्मचाऱ्यांना आस्थापनेवर कायम करण्याचा प्रस्ताव त्वरित निर्णय घ्यावा
अशा प्रकारचे पत्र महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी
महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाकडे पाठवल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस
पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद दादा चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर
महानगरपालिकेतील 249 रोजंदारी व बदली कर्मचाऱ्यांनी इंदापूर येथील भरणेवाडी येथे
महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी जाऊन भव्य
मोठा हार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री
दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना कोल्हापूर
महानगरपालिकेप्रमाणे सोलापूर महानगरपालिका रोजंदारी बदली कामगारांना सेवेत कायम
करण्यासाठी मंत्रालय येथे समक्ष जाऊन
चर्चा द्वारे प्रश्न मार्गी लावेन असे 249
रोजंदारी व बदली कर्मचाऱ्यांना
आश्वासन दिले. यावेळी कामगार नेते गौतम नागटिळक, धोंडीबा
कापुरे , दीपक वाघमारे , श्रीपती
गायकवाड ,मुन्ना आखाडे, बाळू शिंदे ,
अमोल सोनकांबळे, दत्ता कांबळे, धीरज वाघमोडे, राजाराम लोखंडे , बापू वाघमारे ,बाबू ढाले बाळू डोळसे इत्यादी 249
रोजंदारी व बदली कर्मचाऱ्यांसोबत भीमा मस्के, अक्षय मस्के इत्यादी उपस्थित
होते.