महाराष्ट्र राज्य बीबीए/बीसीए सामायिक प्रवेश परीक्षा

महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी बीबीए (BBA) आणि बीसीए (BCA) अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा MAH-B.BBA/BCA/BBM/BMS/MBA Integrated/MCA Integrated CET 2025 अनिवार्य करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ मार्च २०२५ आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा २९ एप्रिल, ३० एप्रिल आणि २ मे २०२५ या तारखांना ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ https://cetcell.mahacet.org/ वर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी संगमेश्वर महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरावा, असे आवाहन प्रवेश प्रक्रिया समन्वयक प्रा. बमनिंग बुक्का (95033 37227) आणि प्रा. गौरव जुगदार (98903 55331) यांनी केले आहे.