महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये एलएचबी कोच; प्रवास होणार अधिक आरामदायी

राज्यातील सर्वात लांब अंतर आणि
सर्वाधिक कालावधीचा प्रवास करणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस आता अधिक आरामदायी
होणार आहे. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस तसेच कोल्हापूर-पुणे
स्पेशल (सह्याद्री एक्स्प्रेस) या गाड्यांचे डबे बदलून त्यामध्ये एलएचबी
(लिंक हॉफमॅन बुश) कोच जोडण्यात येणार आहेत.
कोल्हापूरहून सुटणाऱ्या
गाड्यांमध्ये एलएचबी कोचचा वापर
याआधी कोल्हापूर-मुंबई
महालक्ष्मी एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस या
गाड्यांमध्ये एलएचबी कोच बसविण्यात आले होते. मात्र, त्या डब्यांची
अदलाबदल दक्षिण मध्य रेल्वेने केली होती. मात्र, कोल्हापूर-गोंदिया
महाराष्ट्र एक्स्प्रेस ही पहिली गाडी असेल, ज्यासाठी मध्य
रेल्वेकडून एलएचबी कोचचा वापर केला जाणार आहे. भविष्यात
अन्य गाड्यांच्याही डब्यांचे एलएचबी कोचमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.
एलएचबी कोचमुळे प्रवासी क्षमतेत वाढ
एलएचबी कोच बसवल्याने गाड्यांच्या
डब्यांची एकूण संख्या काहीशी घटणार असली तरी प्रवासी आसन क्षमतेत वाढ होणार
आहे.
महाराष्ट्र एक्स्प्रेस: सध्या 20 डबे असलेल्या या गाडीचे एलएचबी कोच लावल्यानंतर 18 डबे असतील.
- कोल्हापूर-पुणे
स्पेशल (सह्याद्री एक्स्प्रेस): सध्या 16 आयसीएफ
डबे
असलेल्या या गाडीत एलएचबीचे 14
कोच बसवण्यात येणार आहेत.
एलएचबी कोच लागू होण्याच्या तारखा:
✅ महाराष्ट्र एक्स्प्रेस:
- १
जूनपासून
कोल्हापूरहून
- ३
जूनपासून
गोंदियाहून
✅ कोल्हापूर-पुणे स्पेशल (सह्याद्री
एक्स्प्रेस):
- ४
जूनपासून
कोल्हापूरहून
- ५
जूनपासून
पुण्याहून