महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १५ निर्णय : मुंबई-ठाणे नवी मेट्रो, लोकल खरेदी, पुणे-लोणावळा चौपदरीकरणास मंजुरी

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबई-ठाणे नवीन मेट्रो मार्ग, पुणे-लोणावळा चौपदरीकरण, लोकल खरेदी, तसेच दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात वाढ यांचा समावेश आहे.

प्रमुख निर्णयांची ठळक वैशिष्ट्ये

  • सामाजिक न्याय विभाग:
    • संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतील दिव्यांगांना दरमहा १,००० रुपयांची वाढ. आता लाभार्थ्यांना ,५०० मासिक सहाय्य.
  • ऊर्जा विभाग:
    • महानिर्मिती औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या वापराचे धोरण निश्चित.
  • कामगार विभाग:
    • दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ व कारखाने अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा.
  • आदिवासी विकास विभाग:
    • नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना राज्य योजनेऐवजी केंद्राची शिष्यवृत्ती योजना लागू.
  • नगरविकास विभाग (सर्वात मोठे निर्णय):
    • मुंबई आणिक डेपो-वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो-११ प्रकल्पास मंजुरी; खर्च २३,४८७ कोटी.
    • ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुणे मेट्रो (नवीन मार्गिका), नागपूर मेट्रो टप्पा-२ प्रकल्पांस मान्यता.
    • पुणे मेट्रोवरील बालाजीनगर आणि बिबवेवाडी नवी स्थानके.
    • मुंबई लोकल खरेदीसाठी MUTP-3, 3A 3B प्रकल्पांतर्गत निधी; राज्याचा ५०% सहभाग.
    • पुणे-लोणावळा लोकलसाठी तिसरी-चौथी मार्गिका.
    • ठाणे-नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्ग PPP तत्त्वावर.
    • "नवीन नागपूर" अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार व वित्तीय केंद्र (IBFC) उभारणीस मंजुरी.
    • नागपूरभोवती बाह्य वळण रस्ता व चार वाहतूक बेटांची निर्मिती.
  • विधी व न्याय विभाग:
    • वांद्रे (पूर्व) येथील उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलासाठी ,७५० कोटी मंजूर.