महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिल्पकार राम सुतार यांना जाहीर

मुंबई: ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत ही घोषणा केली. 35 लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने अत्यंत प्रतिष्ठेच्या या पुरस्कारासाठी एकमताने सुतार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येत आहे. शिल्पकलेतील अतुलनीय योगदान आणि अनेक ऐतिहासिक शिल्पांची निर्मिती केल्याबद्दल सुतार यांना हा सन्मान प्रदान केला जात आहे. राम सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीसह देशभरातील अनेक महत्त्वपूर्ण शिल्पांची निर्मिती केली आहे. त्यांच्या कार्यामुळे भारतीय शिल्पकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.