महाकुंभमेळा एकतेचा महायज्ञ : मोदी
.jpeg)
प्रयागराज, दि. १३-
प्रयागराज : महाकुंभ मेळाव्याच्या विकास कामांची
प्रतिकृती पाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री
योगी आदित्यनाथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते शुक्रवारी प्रयागराज येथे गंगापूजन करून महाकुंभाचे औपचारिक उद्घाटन करण्यात
आले. यावेळी त्यांच्या हस्ते ५ हजार ५०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे
उद्घाटनदेखील केले. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, हा म
हाकुंभ म्हणजे एकतेचा महायज्ञ आहे, ज्यामध्ये प्रत्येक प्रकारच्या
भेदभावाचा त्याग केला जातो.
पंतप्रधान पुढे म्हणाले, महाकुंभ हे आपल्या देशाच्या हजारो वर्षांपूर्वीपासून चालत
आलेल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक प्रवासाचे एक सद्गुण आणि जिवंत प्रतीक आहे.
महाकुंभ मेळ्यातील १६७ विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच अक्षयवत, हनुमान मंदिर, सरस्वती विहीर, भारद्वाज आश्रम आणि शृंगवरपूर धाम कॉरिडॉरचे उद्घाटन देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. मोदी म्हणाले, कुंभ हे कोणत्याही बाह्य
प्रणालीपेक्षा मनुष्याच्या आंतरिक चेतनेचे नाव आहे. ही जाणीव आपोआप जागृत होते. ही
जाणीव भारताच्या कानाकोपऱ्यातून लोकांना संगमाच्या काठावर
खेचते. आपला भारत हा पवित्र स्थळे आणि तीर्थक्षेत्रांचा देश आहे. गंगा, यमुना,
सरस्वती, कावेरी, नर्मदा अशा असंख्य पवित्र नद्यांचा
देश आहे. प्रयाग म्हणजे जिथे प्रत्येक पंतप्रधानांनी अनेक प्रकल्पांचे
केले लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभ २०२५
साठी विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामध्ये पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी
आणि प्रयागराजमध्ये अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी १० नवीन रोड ओव्हर ब्रिज
किंवा फ्लायओव्ह, कायमस्वरूपी घाट आणि रिव्हरफ्रंट रस्ते
यासारख्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचा समावेश आहे. पायरीवर पवित्र स्थाने आहेत, जिथे
प्रत्येक पायरीवर पुण्यक्षेत्र आहेत.