हत्तुरे वस्ती येथे लिंगायत वधू-वरांचा ; परिचय मेळावा उत्साहात संपन्न

सोलापूर: महात्मा बसवेश्वर वधु-वर सुचक केंद्र कुपवाड सांगली व
जागतिक लिगायत महासभा सोलापूर , राष्ट्रीय लिगायत महामंच भारत यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा.
मातोश्री लि. सौ. सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतीक भवन,हत्तुरे
वस्ती, विमानतळ समोर, मजरेवाडी सोलापूर
येथे राज्यस्तरीय लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लिंगायत
धर्मातील सर्व पोटजातीतील वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता.
प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास हार घालून दीप प्रज्वलन माळी
महासंघाचे अध्यक्ष शंकर लिंगे यांच्या हस्ते करण्यात आला. माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे उदघाटन
करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून
शरण साहित्याचे अभ्यासक चन्नवीर भद्रेश्वरमठ , महात्मा
बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सचिन शिवशक्ती, ओबीसी
सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम माळी, सिद्ध मल्लिकार्जुन
संस्थेचे अध्यक्ष गणेश चिंचोळी, शहीद अशोक कामटे विचारमंचचे
अध्यक्ष योगेश कुंदुर, प्रा.संजय बनसोडे, सुरेश वाले, राजू बिराजदार आदी उपस्थित होते.सामाजिक बांधलिकीतून उपक्रम
घेवून सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये मेळावा
घ्यावे असे आवाहन शंकरराव लिंगे यांनी केले. पालकांनी हुंडा न घेता नोकरी करणारा
मुलगा पाहिजे असा अट्टाहास न धरता कर्तुत्वान अशा मुलांचा व मुलींचा विवाह करावे
असे प्रतिपादन माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी केले. या मेळाव्यास
दीडशे वधू वर,पालक यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी
करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब शेगावे, ओंकार
हत्तुरे, श्रीशैल पॅडशिंगे,सिद्धार्थ
हत्तुरे, नागेश पडनुरे, नागेश धुम्मा,
संतोष पाटील, रुद्रप्पा कांबळे आदीसह परिश्रम
घेतले.