किडनी रुग्ण महिलेला चार्टर्ड विमानातून जीवनदान – उपमुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपली
संवेदनशीलता सिद्ध करत किडनी ट्रान्सप्लांटसाठी मुंबईला जाणाऱ्या शीतल पाटील या
महिलेला जीवनदान दिले. शीतल यांचे विमान
चुकल्याने शस्त्रक्रिया अडचणीत येणार होती, मात्र शिंदे
यांनी आपले चार्टर्ड विमान त्यांच्यासाठी खुले केले. विलंब ठरला आयुष्य वाचवणारा शिंदे
हे काल मुक्ताईनगरमध्ये संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर
मुंबईला परतत होते. त्यांचे उड्डाण जळगाव विमानतळावर थोडे विलंबित झाले, आणि याच वेळी शीतल पाटील यांचे नियोजित विमान सुटून गेले. शितल यांच्यासमोर संकट शीतल पाटील या जळगाव जिल्ह्यातील असून किडनी
प्रत्यारोपणासाठी त्यांना मुंबईत वेळेत पोहोचणे अत्यावश्यक होते. विमान
चुकल्यानंतर शस्त्रक्रिया टळण्याचा धोका निर्माण झाला होता. गिरीश महाजनांनी केली
मदतीची शिफारस घटनेची माहिती मंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी शिंदे
यांना परिस्थितीची कल्पना दिली, आणि शिंदे यांनी "माझ्या दोन अधिकाऱ्यांना जळगावात ठेवीन, पण माझ्या
बहिणीला सोबत घेऊनच जाईन" असे सांगत तात्काळ निर्णय घेतला. मुंबईत दाखल करून
उपचारांची व्यवस्था प्रवासादरम्यान शिंदे यांनी शीतल यांच्याशी संवाद साधून
त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. मुंबईत पोहोचताच रुग्णवाहिकेची सोय करून त्यांना
तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेतृत्वाचा भावनिक स्पर्श पालकमंत्री
गुलाबराव पाटील यांनी सांगितले, “उपमुख्यमंत्री शिंदे
गरजूंना मदतीचा हात देतात. एका लाडक्या बहिणीसाठी त्यांनी जी
तत्परता दाखवली ती सर्वसामान्य जनतेच्या मनाला भावणारी आहे.”