जम्मू सीमावर्ती भागात जनजीवन पूर्वपदावर
.jpeg)
नवी दिल्ली : पाकिस्तानविरोधातील कारवाया
थांबलेल्या नसून फक्त ‘स्थगित’ आहेत. भविष्यातील पावले पाकिस्तानच्या वर्तनावर
ठरतील, असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी
देशवासीयांना संबोधित करताना दिला. त्याआधी १२ मे रोजी भारत-पाकिस्तान DGMOs
(लष्करी संचालन महासंचालक) यांच्यात चर्चा झाली होती. या चर्चेत सीमेवर
गोळीबार टाळण्याचे आणि शांतता राखण्याचे आश्वासन दोन्ही बाजूंनी दिले.
सीमावर्ती भागात जनजीवन पूर्वपदावर
राजौरी आणि जम्मू जिल्ह्यातील सीमेलगतच्या
गावांमध्ये हळूहळू जनजीवन सुरळीत होत आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या
गोळीबारामुळे शाळा बंद होत्या, तसेच शेतीकामेही ठप्प झाली
होती. आता शेतकरी पुन्हा शेतात परतले आहेत आणि शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्रालमध्ये
चकमक सुरू, शोपियांमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा १५ मे रोजी
जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा येथील त्राल परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये
चकमक सुरू झाली आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी
दिली. याआधी १३ मे रोजी शोपियां जिल्ह्यातील कुलमाग येथे झालेल्या चकमकीत तीन
दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते.
संयुक्त राष्ट्रांत भारतीय शिष्टमंडळाची बैठक
न्यू यॉर्कमध्ये भारतीय शिष्टमंडळाने संयुक्त
राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यूएनओसीटीचे अंडर-सेक्रेटरी
जनरल व्लादिमीर व्होरोन्कोव्ह आणि सीटीईडीच्या सहाय्यक महासचिव नतालिया घेरमन यांनी
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त
केला.