लोणीजवळ बिबट्याचा थरार; ग्रामस्थांनी जीवंत पकडले, दोघे जखमी

टिपेश्वर अभयारण्यातून भरकटत आलेल्या बिबट्याने सोलापूर जवळील लोणी-मणांकली परिसरात गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. ऊस आणि द्राक्ष बागांमध्ये लपून तो वारंवार दिसत होता, त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास ग्रामस्थ आणि गोल्ल समाजबांधवांनी एकत्र येत बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. बिबट्याला पकडण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. द्राक्ष बागेला जाळी लावून त्याला बाहेर पडण्याचा मार्ग बंद करण्यात आला. पण बिबट्याने पळून जाण्याचा प्रयत्न करत ग्रामस्थांवर हल्ला केला, ज्यात दोन लोक गंभीर जखमी झाले. अखेर शिताफीने त्याला जाळीत अडकवून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.