लातूर महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न
.jpeg)
लातूर: लातूर महानगर पालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतः जवळील
रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना, शनिवारी
मध्यरात्री उशिरा त्यांच्या शासकीय बंगल्यावर घडली आहे. गोळी डोक्यातून आरपार
गेल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. गोळीचा आवाज ऐकून सुरक्षा रक्षक धावत
आले. त्यांना तातडीने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. त्यांची प्रकृती
नाजूक असून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. पोलिस अधीक्षक सोमय्या मुंडे यांनी
हॉस्पिटलला भेट दिली. निवासस्थान व हॉस्पिटल परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात
आला आहे.आयुक्त मनोहरे नेहमीप्रमाणे रात्री जेवण केल्यानंतर ते घरीच होते. त्यांनी
रात्री ११.३५ वाजेच्या सुमारास आपल्या खोलीत स्वतः जवळील रिव्हॉल्व्हरमधून
डोक्यात गोळी झाडून घेतल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार
सुरू आहेत. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलिसांत घटनेची नोंद घेण्यात येत होती.