लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य; ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया न केल्यास हप्ता थांबणार
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील
लाखो महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, या योजनेसाठी आता ई-केवायसी (E-KYC) अनिवार्य करण्यात
आली आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, ३१ डिसेंबरपर्यंत
ई-केवायसी पूर्ण न केल्यास पुढील महिन्याचा हप्ता मिळणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अद्यापही सुमारे ४५ लाख
महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे
शासनाकडून ई-केवायसीसाठी एक महिन्याची मुदतवाढ देऊन अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२६
पर्यंत वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी ई-केवायसीची अंतिम तारीख १८
नोव्हेंबर होती, जी वाढवून ३१ डिसेंबर करण्यात आली होती. ४५००
रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता ऑक्टोबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता ३ व ४
नोव्हेंबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला होता. मात्र, त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते अद्याप जमा झालेले नाहीत.
शासनाच्या संभाव्य निर्णयानुसार, जानेवारी
२०२६ पर्यंत ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर
आणि जानेवारीचे मिळून सुमारे ४५०० रुपये एकत्र खात्यात जमा होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ई-केवायसी कशी कराल?
- ladakibahin.maharashtra.gov.in
या अधिकृत पोर्टलवर जा
- ‘ई-केवायसी’
पर्याय निवडा
- नोंदणीकृत मोबाईल
नंबरवर आलेला ओटीपी आणि आधार क्रमांक भरा
- आवश्यक वैयक्तिक
माहिती भरा
- वडील किंवा पती
जिवंत असल्यास त्यांचा आधार क्रमांक नमूद करा
- जात निवडा आणि
कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत आहे का याची माहिती द्या
- बायोमेट्रिक
प्रक्रियेद्वारे ई-केवायसी पूर्ण करा