सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विषयावर किसन जाधवांनी घेतली विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची भेट
.jpeg)
सोलापूर -सफाई कर्मचाऱ्यांचे
जीवनमान उंचावून त्यांची उन्नती साधण्यासाठी लाड पागे समिती स्थापन करण्यात आली
आहे या समितीच्या शिफारशीनुसार सोलापूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा
हक्क नियुक्तीच्या अनुषंगाने लाभ देण्याची कारवाही होऊन त्यांची नियुक्ती व्हावी
अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे मुंबई येथील विधान भवन येथे केली. या
मागणीचे निवेदन देखील यावेळी किसन जाधव यांनी बनसोडे यांना दिली. प्रारंभी ईच्छा
भगवंताची परिवाराच्या वतीनं अण्णा बनसोडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात
आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश
गायकवाड, माणिक कांबळे, हुलगप्पा
शासम, महादेव राठोड आदींची उपस्थिती होती. लाड पागे समितीने
दिलेल्या शिफारशी लागू करण्यासाठी शासन सकारात्मक आहे कोणत्याही सफाई कामगारावर
वारसा हक्क नियुक्तीच्या अनुषंगाने अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या
सूचना देखील आपण संबंधित विभागांना दिले आहे लवकरच सफाई कामगाराच्या नियुक्तीच्या
संदर्भात पालिका आयुक्तांना सूचना देऊ अशी ग्वाही देखील यावेळी विधानसभा उपसभापती
अण्णा बनसोडे यांनी किसन जाधव यांना दिली. आता लवकरच सोलापूर महानगरपालिकेतील सफाई
कामगारांना वारसा हक्काने नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा होईल अशी आशा देखील
यावेळी किसन जाधव यांनी व्यक्त केलं.