केसरी टूर्सचे संस्थापक केसरी पाटील यांचे निधन

पुणे : केसरी टूर्स या पर्यटन क्षेत्रातील
कंपनीचे संस्थापक अध्यक्ष केसरी पाटील यांचं निधन झालं आहे. शनिवारी पहाटे
वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी केसरी
टूर्सची स्थापना केली होती. एक जगविख्यात कंपनी म्हणून 'केसरी'चं नाव घेतलं जातं. केसरी पाटील यांना पर्यटन क्षेत्रीतील एक विद्यापीठ म्हणून
ओळखलं जात होतं. अथक परिश्रम आणि कठीण संघर्षातून त्यांनी 'केसरी टूर्स'ला एका वेगळ्या उंचीवन नेऊन ठेवलं.
शनिवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी
संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत बांद्रा येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल.
त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांचावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.