केजरीवाल यांचे चारित्र्य शुद्ध नाही ; दिल्ली निकालावर आण्णाहजारे यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांचे विचार, चारित्र्य शुद्ध नाही म्हणूनच त्यांचा पराभव झाला. त्यांचे जीवन निष्कलंक
नव्हते. हे आमच्यासाठी काही करतील असा मतदारांचा विश्वास नव्हता, मी त्यांना वारंवार सांगितलं, मात्र त्यांनी ऐकलं
नाही, असेही ते म्हणाले. ‘दिल्लीत दारूच्या ठेक्यांच्या
माध्यमातून जो आर्थिक घोटाळा झाला त्यामुळे ते बदनाम झाले. एकीकडे ते लोकांच्या
चारित्र्याबद्दल बोलतात. मात्र दुसरीकडे दारू ठेक्यांमध्ये घोटाळे करतात, असे लोकांना वाटू लागले.’ ‘मी सुरुवातीपासून पक्ष काढण्यास विरोध केला
होता. पक्ष आला की त्यात हौसे गवसे आणि नवसे सगळे येतात. त्यामुळे पक्ष बदनाम
होतो. अरविंद केजरीवाल यांनी जनतेचा कौल मान्य केला पाहिजे’, असे अण्णा हजारे म्हणाले.