केजरीवालांनी वाढवले भाजपचे टेंशन

आप सरकारने दिल्लीतील पुरोहितांसाठी एक नवीन योजना आणली आहे. अरविंद
केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत पुजारी ग्रंथी सन्मान योजनेची घोषणा केली. या
योजनेंतर्गत सरकार स्थापन झाल्यानंतर दिल्लीतील पुजारी आणि पुरोहितांना दरमहा १८
हजार रुपये दिले जातील. त्यासाठीची नोंदणीही सुरू आहे. अरविंद केजरीवाल यांनी सांगितले
की, आम्ही
मंदिरांचे पुजारी आणि गुरुद्वारांच्या पुजाऱ्यांना मानधन देण्याची घोषणा केली आहे.
पुजारी-ग्रंथी सन्मान योजना असे या योजनेचे नाव आहे. आमचे सरकार सत्तेवर येताच या
योजनेंतर्गत पुजारी आणि पुरोहितांना दरमहा १८ हजार रुपये दिले जातील. या योजनेसाठी
कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिरातून नोंदणी सुरू झाली आहे. या नव्या योजनेच्या
निमित्ताने अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावरही निशाणा साधला. ते म्हणाले
की, आता भाजप ही योजना थांबवू शकत नाही. माझी भाजपवाल्यांना
विनंती आहे की, महिला सन्मान आणि संजीवनी योजने सारखी ही
योजना बंद करण्याचा प्रयत्न करू नका. तसेच ज्या राज्यात काँग्रेस आणि भाजप सरकार
आहेत त्यांनी देखील ही योजना लागू करावी, अशी अपेक्षा
केजरीवाल यांनी व्यक्त केली.
रोहिंग्यांच्या मुद्द्यावर केजरीवाल यांनी हरदीप सिंग पुरीच्या अटकेची
मागणी केली आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले, मी त्यांना हरदीप सिंग पुरीला अटक करण्याची मागणी
करतो. कारण हरदीप सिंग पुरी आणि अमित शहा यांच्याकडे रोहिंग्यांची वस्ती कशी आणि
कुठे झाली याची सर्व माहिती आहे