केदारनाथ येथे रोप वे प्रकल्पास मंजुरी; ८ तासांचा प्रवास अवघ्या ३६ मिनिटांत

नवी दिल्ली : चार धाम यात्रेमधील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या केदारनाथ येथे जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने सोनप्रयाग ते केदारनाथदरम्यान १२.९ किमी लांबीच्या रोप वे प्रकल्पाला मंजुरी दिली.

प्रकल्पाचे वैशिष्ट्ये:

🔹 लांबी: १२.९ किमी
🔹 प्रवासाचा कालावधी: -९ तासांवरून थेट ३६ मिनिटे
🔹 प्रवासी क्षमता: ३६ जण प्रति गोंडोला
🔹 एकूण खर्च:,१ कोटी

यात्रेकरूंसाठी मोठा दिलासा

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या रोप वेमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे. उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय रोप वे विकास कार्यक्रम - पर्वतमाला परियोजना’ अंतर्गत या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे पर्यटक आणि यात्रेकरूंसाठी केदारनाथ यात्रा अधिक सोपी होणार आहे.