विजयपूरमध्ये 'कर्नाटक पोलीस रन 2025' – 9 मार्च रोजी मॅरेथॉन स्पर्धा

विजयपूर येथे 'कर्नाटक पोलीस रन 2025' अंतर्गत 5 किमी
मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 9 मार्च, रविवार रोजी करण्यात आले आहे. 'ड्रग फ्री कर्नाटक',
'सर्वांसाठी फिटनेस' आणि 'आमचे पोलीस आमचा अभिमान' या थीम अंतर्गत जिल्हा
पोलिसांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
स्पर्धेचा मार्ग:
ही मॅरेथॉन सकाळी 6:30 वाजता गोलगुंबज येथून सुरू होईल आणि जिल्हा स्टेडियम, बसवेश्वर सर्कल, गांधी चौक, शिवाजी
सर्कल, पाण्याची टाकी, सोलापूर रोड मार्गे जात जिल्हा पोलीस परेड ग्राउंड येथे समाप्त होईल.
बक्षिसे आणि सहभागींसाठी सुविधा:
- विविध
श्रेणीतील प्रथम,
द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना प्रमाणपत्रे व पदकांचे
वितरण
करण्यात येणार आहे.
- सर्व
सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट आणि कॅप देण्यात येणार आहेत.
नोंदणीसाठी संपर्क:
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी 8 मार्चच्या आत आपली नावे खालील अधिकाऱ्यांकडे
नोंदवावीत –
📞 श्रीरंगप्पा आरएसआय –
9901145001
📞 मल्लनगौडा आरएसआय –
9880299439
📞 दानेश कल्याणी आरएसआय –
8050481012
जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण
निंबरगी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग
घेण्याचे आवाहन केले आहे.