कर्नाटक 2nd PUC निकाल आज जाहीर होणार; ७.१३ लाख विद्यार्थी झाले होते परीक्षेला उपस्थित

बंगळुरू : कर्नाटक स्कूल परीक्षा आणि मूल्यांकन बोर्ड (KSEAB) कडून आज, ८ एप्रिल २०२५ रोजी कर्नाटक सेकंडरी पीयूसी (2nd PUC) म्हणजेच १२वी बोर्ड परीक्षेचा निकाल दुपारी १२.३० वाजता जाहीर केला जाणार आहे. हा निकाल karresults.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. या परीक्षेची सुरुवात कन्नड आणि अरबी पेपरपासून झाली होती, तर समारोप हिंदी पेपरने झाला. यासाठीची प्रोव्हिजनल आन्सर की २१ मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यात एकूण ३५ विषयांसाठी मॉडेल उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली होती. ७.१३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग यंदाच्या परीक्षेमध्ये एकूण ७,१३,८६२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात ३,३५,४६८विद्यार्थी, ३,७८,३८९ विद्यार्थिनी आणि ५ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश होता. परीक्षेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता.
निकाल कसा पाहाल?
1.
अधिकृत वेबसाइट karresults.nic.in
वर लॉगिन करा.
2.
“Karnataka 2nd PUC Result 2025” या लिंकवर क्लिक करा.
3.
रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर
टाका.
4.
तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
5.
निकालाची प्रिंट काढून ठेवा.