करिश्मा कपूरच्या माजी पतीचे दुर्दैवी निधन; पोलो खेळाचा शौक ठरला प्राणघातक

लंडन / मुंबई | अभिनेत्री करिश्मा कपूर हिचे माजी पती आणि उद्योजक संजय कपूर यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी इंग्लंडमध्ये निधन झाले. प्रारंभी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते, मात्र आता त्यांच्या मृत्यूमागचे कारण वेगळेच असल्याचे उघड झाले आहे. मधमाशी गिळल्याने मृत्यू एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, संजय कपूर पोलो खेळताना अचानक गुदमरल्यासारखे वाटल्याने त्यांनी खेळ थांबवला आणि मैदानाबाहेर गेले. त्यांनी अनवधानाने मधमाशी गिळली, जी त्यांच्या गळ्यात अडकली आणि तिथेच तिने दंश केला. या घटनेनंतर त्यांना तीव्र allergic reaction आणि हृदयविकाराचा झटका आला, आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. विमान दुर्घटनेवर पोस्ट, आणि त्यानंतर मृत्यू विशेष म्हणजे, संजय कपूर यांनी १२ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत ट्विटरवर (X) पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते – अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान अपघाताची खूप दुःखद बातमी मिळाली. माझ्या संवेदना आणि प्रार्थना सर्व पीडित कुटुंबांसोबत आहेत. देव त्यांना या कठीण काळात शक्ती आणि धैर्य देवो.” या पोस्टनंतर काही तासांतच त्यांचे निधन झाले. वैयक्तिक आयुष्य संजय कपूर यांनी २००३ साली अभिनेत्री करिश्मा कपूरशी विवाह केला होता. दोघांमध्ये २०१४ साली घटस्फोट झाला. त्यांना समायरा आणि कियान ही दोन अपत्ये आहेत. मुलांची कस्टडी करिश्माकडे आहे. नंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेव यांच्याशी विवाह केला होता. संजय कपूर हे सोना पोलो संघाचे मालक होते आणि पोलो खेळाचे मोठे चाहते होते.