काजल अग्रवालच्या निधनाच्या अफवा खोट्या; अभिनेत्रीचं स्पष्टीकरण, "मी सुरक्षित आहे"

बॉलीवूड आणि साउथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवाल हिच्या मृत्यूची खोटी बातमी सोमवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. या अफवेमुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. मात्र, काजल अग्रवालने स्वतः पुढे येत या बातम्यांना फेटाळून लावलं आहे.

काजलने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं –
 “मी माझ्या अपघात झाल्याच्या काही खोट्या बातम्या ऐकल्या आहेत. पण या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. देवाच्या कृपेने मी ठीक आहे आणि सुरक्षित आहे. अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पुढे पसरवू नका. आपण सकारात्मकतेवर आणि सत्यावर लक्ष केंद्रित करूया.”

काजल अग्रवालच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी मोठा दिलासा घेतला आहे. चाहत्यांनी तिच्या सुरक्षिततेबद्दल समाधान व्यक्त करत अफवा पसरवणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.