पत्रकारांनी समाज सुधारण्यासाठी लेखन करावे - गोपाळ नाईक

विजयपुर: पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी म्हणून समाज सुधारण्यासाठी निर्भीड पणे लेखन करुन समाजाला दिशा देण्याचे कार्य करावे असे ज्येष्ठ पत्रकार गोपाळ नाईक यांनी सांगितले शहरातील पत्रकार भवनात कार्यरत पत्रकार संघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. पत्रकारांवर सामाजिक न्याय देण्याची मोठी जबाबदारी आहे त्यांनी समाजविघातक काम करणे टाळावे.  जिल्ह्याची शांतता राखण्याची जबाबदारी आपली असायला हवी, अशी सूचना त्यांनी केली. पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संगमेश चुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात  कर्नाटक मीडिया अकादमी पुरस्कार विजेते सुशलेंद्र नाईक, महेश शटगार आणि राज्य पत्रकार संघाच्या वतीने विशेष पुरस्कार प्राप्त अल्लामप्रभू मल्लिकार्जुनमठ यांचा सन्मान करण्यात आला  संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष इंदुशेखर मनुर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कार्यकारिणी सदस्य बसवराज उल्लागड्डी यांनी आभार मानले. यावेळी सरचिटणीस मोहन कुलकर्णी, राज्य कार्यकारिणी सदस्य डी.बी.वडवडगी, के.के.कुलकर्णी, उपाध्यक्ष प्रकाश बेन्नूर, सचिव अविनाश बिदरी, कोषाध्यक्ष राहुल आपटे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोक यदहळ्ळी, शशिकांत मेंडेगर, गुरू गद्दनकेरी, इरफान  शेख, सुनील कांबळे, विनोद सारवाड, , नागेश नागुर, सद्दाम हुसेन जमादारशिवनगौडा पाटील व इतर उपस्थित होते.