नवीन आर्थिक वर्षात नोकरीच्या संधींत वाढ; ४५ टक्के कंपन्यांची कायमस्वरूपी भरतीची योजना

नवी दिल्ली :- नवीन आर्थिक वर्ष नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी शुभ संकेत घेऊन आलं आहे. मनुष्यबळ सेवा क्षेत्रातील जीनियस कन्सल्टंट्स’ कंपनीने केलेल्या अभ्यासानुसार, देशातील ४५ टक्के कंपन्यांनी नवीन कायमस्वरूपी पदांसाठी भरती करण्याची तयारी दर्शवली आहे.

  1. नवीन भरतीत वाढ; कंत्राटी व प्रकल्प आधारीत संधीही वाढत
  2. या अहवालानुसार,
  3. १३ टक्के कंपन्या सध्याच्या मनुष्यबळात बदल करणार आहेत.
  4. २६ टक्के कंपन्या तात्पुरत्या, कंत्राटी किंवा प्रकल्प आधारीत नोकऱ्यांसाठी भरती करत आहेत.
  5. फक्त १६ टक्के कंपन्यांनी यंदा कोणतीही भरती योजना नसल्याचं सांगितलं आहे.
  6. मध्यमस्तर, नवोदित व वरिष्ठ पदांवरही संधी
    1. ३७% कंपन्या मध्यमस्तरावरील व्यावसायिक भरतीवर भर देत आहेत.
  7. २६% कंपन्या गिग व कंत्राटी सल्लागार पदांसाठी इच्छुक आहेत.
  8. १९% कंपन्या नवोदित उमेदवारांना संधी देणार आहेत,
  9. तर १% कंपन्या वरिष्ठ पदांवरील भरती करणार असल्याचंही अहवालात म्हटलं आहे.
  10. कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक भरतीची शक्यता?
    1. रिटेल, ई-कॉमर्स व क्यू-कॉमर्स क्षेत्रात सर्वाधिक – २१% भरती अपेक्षित.
  11. वाहन व ईव्ही क्षेत्रात – १५% कंपन्यांची भरतीची योजना.
  12. अक्षय ऊर्जा आणि अभियांत्रिकी प्रकल्प – ११% भरती वाढीचा अंदाज.