जेट विमानाची लष्करी हेलिकॉप्टरला धडक : अमिरेकेत 18 ठार

अमेरिका: अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये ६० प्रवासी असलेले एक जेट विमान आणि आर्मीच्या  हेलिकॉप्टरची बुधवारी रात्री हवेतच धडक झाली. या अपघातानंतर विमान आणि हेलिकॉप्टर दोन्हीही पोटोमॅक नदीत कोसळले. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. ही घटना वॉशिंग्टन डीसीच्या बाहेर असलेल्या रेगन नॅशनल विमानतळाजवळ घडली. यामुळे रेगन विमानतळावरील सर्व विमान उड्डाणे आणि लँडिंग थांबवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  सीबीएसच्या न्यूजच्या वृत्तानुसार, पोटोमॅक नदीत बचावकार्य सुरु असून बुधवारी रात्री किमान १८ मृतदेह सापडले आहेत.फेडरल विमान वाहतूक प्रशासन आणि संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेगन नॅशनल विमानतळाजवळ ६४ जणांना घेऊन जाणारे एक प्रवासी विमान धावपट्टीजवळ येत असताना आर्मी ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरशी हवेत धडकले.  मेट्रोपॉलिटन पोलिस विभागाच्या म्हणण्यानुसार, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची पुष्टी झालेली नाही. घटनास्थळी आपत्कालीन मदतकार्य सुरू आहे.

विमानात ६० प्रवासी, हेलिकॉप्टरमध्ये तीन सैनिक

एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट ५३४२ हे विमान ६० प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्ससह विचिटा, कनसास येथून निघाले होते. तर हेलिकॉप्टरमध्ये तीन सैनिक होते. सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार, स्थानिक वेळेनुसार रात्री ९ वाजण्याच्या सुमारास रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळावर रनवे ३३ जवळ जात जाताना पीएसए (PSA) एअरलाइन्सचे बॉम्बार्डियर CRJ 700 हे प्रादेशिक विमान हवेतच सिकोर्की H-60 हेलिकॉप्टरला धडकले," असे फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.