जयकुमार गोरे यांच्या कथित बदनामी प्रकरणी रामराजे निंबाळकर यांना समन्स

सातारा: सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कथित बदनामी प्रकरणी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांना पोलिसांनी समन्स बजावले आहे राज्य विधानसभेचे माजी सभापती आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. रामराजे नाईकनिंबाळकर यांना साताराच्या वडूज पोलिसांनी समन्स पाठवले आहे. तसेच त्यांना उद्या सकाळी 11 वाजता चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकर यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणात यूट्यूब पत्रकार तुषार खरात याच्याकडून मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणात रामराजे नाईकनिंबाळकर यांना चौकशीसाठी हे समन्स पाठवण्यात आले आहे. या प्रकरणात शरद पवार गटाचे नेते सामील असल्याचा आरोप मंत्री जयकुमार गोरे यांनी केला होता. त्यामुळे आता रामराजे नाईकनिंबाळकर यांना समन्स पाठवण्यात आल्यामुळे या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप झाला होता. या आरोपांवर मंत्री जयकुमार गोरे स्पष्टीकरण दिले होते. शिवाय त्यांनी सभागृहात हक्कभंग प्रस्ताव देखील दाखल केला आहे.